….तरच दारूविक्री सुरू ठेवावी- पृथ्वीराज चव्हाण

सातारा |    ढासळलेली अर्थव्यवस्था सुरू करण्याचा एक पर्याय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीला परवानगी दिली आहे. राज्यात दारूच्या दुकानाबाहेर दोन दिवसांत जी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तसंच नंतर तेथील प्रशासनाने दारू विक्री बंद करण्याचे आदेश दिले. जर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दारूविक्री होत असेल तर काहीच हरकत नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

गेल्या दोन दिवसांत दारूची विक्री करताना जरासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. दारूच्या दुकानावर होणारी गर्दी पाहिली की आपसूक लक्षात येतं की सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाहीत. मात्र लोकांनी जर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तरच दारू विक्री सुरू ठेवावी, असं ते म्हणाले आहेत.

दारू विक्री करताना सध्या गोंधळाचं चित्र आहे. हा निर्णय घेताना जर दोन दिवसांचा अवधी दिला असता तर ऑनलाईन वगैरेची सोय करत आली असती. आणि आज जो गोंधळ उडाला तो गोंधळ उडाला नसता,  असंही चव्हाण म्हणाले.

दरम्यान, दीड महिन्यातून सोमवारी आणि मंगळवारी देशभरातील दारूची दुकाने उघडली होती. इतकी मोठी प्रतिक्षा केल्यानंतर मद्यप्रेमींचा आनंदाला उधाण आलं होतं. त्यांनी ठिकठिकाणच्या दारू दुकानाबाहेर दारू घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाने देशातला विक्रम मोडला; आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण तसंच मृत्यूंची नोंद…!

-पुण्यातील ‘गोल्ड’मॅन कायमच हरले आयुष्याची लढाई

-कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला एकही सुट्टी नको म्हणणाऱ्या 2 पोलिसांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप!

-“लॉकडाऊनचा निर्णय नोटबंदीसारखा न घेता देशाला वेळ द्यायला हवा होता”

-पुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन