Loading...
महाराष्ट्र मुंबई

…तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार; नागपाड्यातल्या महिलांनी केला निर्धार

मुंबई |  मुंबईतल्या नागपाड्यातल्या महिलांनी केंद्र सरकार जोपर्यंत CAA, NRC कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहे, असा इरादा केला आहे. गेले अनेक दिवस नागपाड्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे.

नागपाड्यातल्या या आंदोलनात जावेद आनंद, जावेद डिसुझा यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. जोपर्यंत राज्याच्या विधानसभेत कायद्याविरोधी ठराव मंजूर करत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या जागेवरून उठणार नाही, असं आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Loading...

पोलिसांची परवानगी घेऊनच आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करावे अन्यथा हे आंदोलन बेकायदाशिर होईल, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

दरम्यान, नागपाडा मोरलॅड रोड येथे आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. यावेळी वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 200 ते 300 महिला आंदोलनकर्त्यांवर आणि आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोपर्डी खटल्याच्या महत्वाच्या सुनावणीला वकील गैरहजर; संभाजीराजे संतापले

-माझ्या भोवती महिला भगिणींचं कवच… मज काय कुणाची भिती- नरेंद्र मोदी

-कर्जमुक्ती करून आपण शेतकऱ्यांवर उपकार करत नाही- उद्धव ठाकरे

-बजेटवरून माजी अर्थमंत्र्यांच्या टीकेचा बाण आजी अर्थमंत्र्यांवर!

-माझ्या आमदारकीचा पगार मी सामाजिक गोष्टींसाठी वापरेल- रोहित पवार

Loading...