पुण्यातील डॉक्टरने लेकीच्या लग्नाचा खर्च वाचवत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारलं घर!

पुणे | पुण्यातील डॉ. मिलिंद भोई यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलेला सुंदर घर बांधून देण्याचा संकल्प केलाय. हा संकल्प लवकरच पूर्ण होणार असून लवकरच नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. अर्धापुर शहरातील कृष्णा नगर परिसरात हे घर बांधण्यात येत असून बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुण्यजागर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच पुण्यातील विविध कुटुंबात दहा दिवस या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना घेऊन दिवाळी साजरी करण्यात येते.

या प्रतिष्ठाण कडून असं कुटुंब सुशिक्षित व आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला जातोय. या प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

डोक्यावर आपल्या हक्काची छत असावं हे प्रत्येकाचं स्वप्न, पण हे स्वप्न साकार होतंच असं नाही. तसेच घरी कर्ता पुरुष नसला की आणखीन अवघड होते. अशा विविध विवंचनेत असणाऱ्या या शेतकरी कुटुंबाला मायेचा ओलावा, डॉ मिलिंद भोई यांनी देवून लक्ष्मी साखरे यांच्या घराचं स्वप्न साकार केलं आहे.

डाॅ मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री हिचा विवाह सोहळा शनिवारी 22 जानेवारी रोजी पूण्यात ऋषिकेश गोसावी यांच्याशी संपन्न होणार आहे.तर या नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा पूढील महिन्यात संपन्न होणार आहे.

आपल्या अन्नदात्यां विषयी कृतज्ञता ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. शेतकरी आपल्या अन्नदाता.शेतकरी कुटुंबात अडचणी येतात. हा अडचणीत सापडलेला शेतकरी टोकाचा निर्णय घेतो. ही वेळ कोणत्याही कुटुंबावर येवू नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. या सामाजिक जाणीवेतून डॉ. भोई यांनी हा संकल्प केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा झाली आई; सरोगसीद्वारे घरी बाळाचं आगमन 

‘ही’ लक्षणं दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा; Omicron ची 14 लक्षणं समोर 

“अजित पवार आम्हाला विश्वासात घेत नाहीत”; चंद्रकांत पाटलांचा आरोप 

 अखेर तारीख ठरली! आमिर खानने केली मोठी घोषणा

प्रियंका गांधी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत??? मोठं वक्तव्य आलं समोर