पुणे महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला. उत्सव मंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडणं, सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेणं, यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मंडळांच्या बैठकीत एकमत झालं आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजाराचं संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदा पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय.

दरम्यान, गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करुन सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘परप्रांतीयांच्या जाण्याने रिक्त जागांवर रोजगाराची संधी साधा’; शिवेंद्रराजेंचं स्थानिकांना आवाहन

-निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण…

-‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं; पोलीस कर्मचाऱ्यांना दिली ‘ही’ खास भेट

-‘तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’; प्रवीण तरडेंनी ‘त्या’ शेतकऱ्याला दिला शब्द