लॉकडाऊनमध्ये घरमालकिणीचा भाड्यासाठी तगादा, पुण्यात पहिला गुन्हा दाखल

पुणे | पहिल्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने घरमालकांना तीन महिने भाड्यासाठी तगादा लावू नये, असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही मनमानी पद्धतीने घरभाडं वसूल करण्याचे प्रकार राज्यभर सुरु होते. आता याप्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यातील नवी पेठेत पेईंगगेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणीकडे घरभाड्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या घरमालकीणीवर गुन्हा दाखल केला आहे. श्रेया असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घरमालकिणीचं नाव आहे असून मेघा नावाच्या तरुणीने यासंदर्भात तक्रार दिली होती.

ठरल्याप्रमाणे 1700 भाडे दे ,अन्यथा रूम खाली कर, असा तगादा घरमालकिणीने लावला होता.  गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्याकडे यासंदर्भात तक्रार आली होती. त्यानुसार या तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर घर मालकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे भादवि 188, 506(1), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा क. 51(ब), साथीचे रोग प्रतिबंधक कायदा क. 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाची सूचना प्रसिद्ध झालेली असून जगभर पसरलेल्या कोविड19 साथीच्या रोगाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे कोणत्याही घरमालकाने भाडेकरूकडून सक्तीने घर भाडे वसूल करू नये. तसेच किमान 3 महिने वसुली पुढे ढकलावी अशा लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, अन्यथा शाळांवर कारवाई करणार- शिक्षणमंत्री

-खडकवासल्यातून मलाच उमेदवारी मिळणार होती, मात्र… रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा

-गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

-जिवलग मित्र वाजिद खानच्या निधनावर सलमानचं भावनिक ट्विट

-आम्हाला सलून उघडायला परवानगी द्या, नाहीतर….; सलून व्यावसायिक आक्रमक