Loading...
पुणे महाराष्ट्र

“हे ही दिवस जातील… माणुसकी आणि नैतिकता सोडू नका”

पुणे | कोरोनाचं भीषण संकट महाराष्ट्रावर आहे. मात्र अशाही परिस्थितीत लोक परिस्थितीचा गैरफायदा घेऊ इच्छित आहे. पुण्यामध्ये चढ्या दराने भाजीपाला आणि फळविक्री होत आहे हे निदर्शनास आल्याने महापौरांनी विक्रेत्यांना कळकळीचं आवाहन केलं आहे. (Pune mayour Murlidhar mohol Appeal Vegitable vendors)

कोरोनामुळे आलेले हे वाईट दिवसही लवकरच जातील परंतू या काळआत माणुसकी आणि नैतिकता सोडू नका, असं भावनिक आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विक्रेत्यांना केलं आहे. कठीण काळात सगळ्यांनी सगळ्यांची साथ दिली पाहिजे तरच आपण लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर पडू, असं ते म्हणाले. (Pune mayour Murlidhar mohol Appeal Vegitable vendors)

Loading...

संकटकाळी काही भाजीपाला आणि फळविक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात महापौरांकडे येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

दरम्यान, पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाग्रस्त दाम्पत्य काल बरं झालेलं असल्याची वार्ता महापौरांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-महाराष्ट्रातले 15 कोरोना पेशंट ठणठणीत बरे झाले आहेत; आरोग्य यंत्रणेला मोठं यश

-“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”

-शहरातून गावाकडे पळणाऱ्यांना संजय राऊत यांचा सोप्या शब्दात खास सल्ला!

-‘कोरोना रोखण्यासाठी भारताने घेतलेले निर्णय योग्यच’; WHO कडून भारताचं कौतुक

-26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली

Loading...