Loading...
Top news पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना आता वाहनेही बाहेर काढता येणार नाहीत, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे | पुणेकरांना आता पूर्णवेळ घरातच थांबावं लागणार आहे. पुणेकरांना वाहनेही बाहेर काढता येणार नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक थांबणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह, ओला, उबर अशा सेवाही बंद होतील. नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Loading...

राज्यातील नागरी भागांत संचारबंदी सुरू असली तरी अनेक ठिकाणी वाहतूक सुरू आहे. लोकांनी संचारबंदी पूर्णपणे मनावर न घेतल्याने पोलिसांना हे पाऊल उचलावं लागत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी संचारबंदीचा आदेश रविवारी रात्रीच काढला होता. त्यामध्ये कोणत्याही कारणासाठी नागरीकांना शहरामध्ये फिरता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक; रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

-“आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक कोरोनाच्या विरोधात लढत आहे”

-कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मदतीसाठी सरसावले ‘हे’ उद्योगपती

Loading...

-वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी जिओचा खास प्लॅन लाँच; मिळणार तब्बल 102 जीबी डेटा

-“चीनने आपल्या कोरोना व्हायरससंबंधी लवकर माहिती द्यायला हवी होती”

Loading...