ऐसे कैसे चलेगा खानसाब?; पुणे पोलिसांचं ट्विट

पुणे | पुणे पोलिसांनी सोशल मीडियावरील ट्विटर या प्लॅटफॉर्मवर धमाल करताना दिसत आहेत. अर्थात कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करताना पुणे पोलिसांचं ट्विटरवरील अकाऊंट सध्या त्यांच्या नावीन्यपूर्ण ट्वीट्समुळे चांगलंच चर्चेत आहे.

पुणे पोलिसांच्या या ट्विटवर एका ट्विटर यूझरने एका फॅन्सी नंबरच्या गाडीचा फोटो शेअर करत यावर कारवाई करण्यास सांगितलं. या युझरला पुणे पोलिसांनी मजेशीर उत्तर दिलं आहे.

खानसाब  को कुल भी बनना है, खानसाब को हेअरस्टाईल भी दिखाना है, खानसाब को हिरो वाली बाईक भी चलानी है, खानसाब को रूल्स फॉलो नहीं करने….ऐसे कैसे चलेगा खानसाब, असं ट्विट पुणे पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ट्विटरवर पुणे पोलिसांनी देखील आपलं अकाऊंट सुरु केलं आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच ट्विटर यूझर्सची फिरकी घेण्याचं कामही सध्या या अकाऊंटवरुन पुणे पोलिस करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या- 

-सतास्थापनेचे शिलेदार खासदार संजय राऊत सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच गेले मंत्रालयात

-“एसआयटीचा तपास झाला तर ज्यांनी खरोखरच दंगल भडकवली त्यांची नावे त्यातून बाहेर येतील”

-बीगबींनी केलं रोहित शर्माच तोंडभरून कौतुक

-…तर भाजपने मला कधी ओळखलंच नाही- मुख्यमंत्री

-महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते”