पुणेकरांनो काळजी घ्याच! पुण्यातील ‘या’ रुग्णालयातून समोर आलं धक्कादायक वास्तव!

पुणे | कोरोनानं सध्या संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. पुण्यातही कोरोनाचा कहर अद्याप चालूच आहे. दिवसेंदिवस पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतंच चालला आहे. अशातच आता पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.

नायडू हॉस्पिटलमध्ये सुमारे वीस ते पंचवीस कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक महावितरणाचा वीज पुरवठा खंडित झाला. तेव्हा हॉस्पिटलमधील जनरेटर चालू होणं अपेक्षित होतं.

मात्र, हॉस्पिटलमधील जनरेटर खराब झाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात आले होते. सुदैवाने दहा मिनिटांनी वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानं रुग्णांचा जीव वाचला आहे. मात्र, नायडू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा जीव काही काळासाठी धोक्यात आला होता.

दरम्यान, बीड मधील शासकीय रुग्णालयात वीजपुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटर बंद पडून एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला होता.

महत्वाच्या बातम्या-

मिशन राम मंदिर पु्र्ण आता आता लक्ष्य…; भाजपच्या धडाडीच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

मुख्यमंत्र्यांनंतर आता विरोधी पक्ष नेत्यालाही झाली कोरोनाची लागण!

मुूंबईमध्ये जोरदार पाऊस; राज्यात दोन दिवस ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा!

राज्यातील आणखी एक संस्था गुजरातला हलवली, दुर्देवं म्हणजे नेत्यांनी शब्दही काढला नाही!

अयोध्या निकाल हा तथ्य आणि पुराव्यांवर नाही तर…-प्रकाश आंबेडकर