Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“निव्वळ लज्जास्पद, एवढीच तुमची मदुर्मकी?…”, राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर फडणवीस कडाडले

devendra fadanvis 2

मुंबई | राज्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

राणा दाम्पत्यांच्या अटकेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार टीका केली आहे.

इतकी दंडुकेशाही?, इतका अहंकार?, इतका द्वेष?, सत्तेचा इतका माज, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला?, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे.

सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या…पण, जनता सारे काही पाहते आहे. निव्वळ लज्जास्पद, असंही फडणवीस म्हणाले आहेत. लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत. भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले झाले तरी आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला तरीही साधा गुन्हा दाखल नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा केली तरीही साधी दखल सुद्धा नाही. हनुमान चालीसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर थेट अटक केली, असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

BIG BREAKING: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

आत्ताची मोठी बातमी! राणा दाम्पत्यास अखेर अटक; पोलीस स्टेशनबाहेर तणावाचं वातावरण

“मर्द आहात ना?…”, नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

“…म्हणून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये”

शेवटच्या ओव्हरला राडा! कुलदीप मैदान सोडून निघाल्यावर युझीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ