Top news क्राईम

धक्कादायक! अंगणात तीन चिमुरड्यांचा रंगला होता डाव अन् अचानक…

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात शुक्रवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अंगणात तीन चिमुरड्यांचा खेळाचा डाव रंगला होता. त्यावेळी, अचानक मालवाहतूक करणारा एक पिकअप भरधाव वेगाने आला आणि त्यानं या तीन चिमुरड्यांना चिरडलं.

अलेशा मेश्राम (वय 7), अस्मित मेश्राम(वय 10) आणि माही रामटेके(वय 12) ही तीन मुले घराच्या अंगणामध्ये खेळत होती. त्यावेळी आष्टी-गोंडपिंपरी मार्गावरून जाणाऱ्या पिकअप चालकाचा ताबा अचानक सुटला आणि गाडी थेट आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर राहणाऱ्या पंढरी मेश्राम यांच्या अंगणात शिरली.

या पीकअपने अंगणात खेळणाऱ्या अलेशा, अस्मित आणि माही यांना जोरदार धडक दिली. यामध्ये 7 वर्षाच्या अलेशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अस्मित आणि माही यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तीन चिमुरड्यांवर अचानक ओढावलेल्या या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गोंडपिंपरी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

सुशांतच्या जवळच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; सुशांत बेशुद्ध अवस्थेत असायचा तेव्हा रिया…

खळबळजनक! भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र सरकार पाडण्याचा विचार असतो”

झोपेत असलेल्या तरुणाच्या पॅंटमध्ये कोब्रा नाग शिरला अन्…