Loading...
देश

देशात बेरोजगारी एवढी वाढलीय की देशातील तरुण मोदींना लाठ्यांनी मारतील- राहुल गांधी

नवी दिल्ली | देशात बेरोजगारी एवढी वाढली आहे की देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठ्यांनी मारतील, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातला आहे.

भाजप सदस्यांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी बोलताना नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकवेळ अशी येईल की देशातील तरुण मोदींना लाढ्यांनी मारतील, असं ते म्हणाले होते.

Loading...

नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बोलताना राहुल गांधींचा या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. असं होणार असले तरी मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करून स्वतःला दंडाप्रुफ करून घेईन, असा टोला मोदी यांनी लगावला होता.

शुक्रवारी लोकसभेत बोलताना मोदींनी तुफान फटकेबाजी केली होती. मी एक गोष्ट कधीही करणार नाही, विरोधकांची बेरोजगारी कधीही जाऊ देणार नाही, असा चिमटा त्यांनी काढला होता.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन- तानाजी सावंत

-शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन- तानाजी सावंत

-शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या; दोन जोड्या करतायत लग्न

-शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या; दोन जोड्या करतायत लग्न

-बॅकफूटला गेलेल्या भाजपला अखेर गुड न्यूज!

Loading...