“सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा”

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने सर्व जगभरात भीतीचे वातावरण पसरवलं आहे. आपल्या देशातही केोरोनाबाधित काही रूग्न सापडल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

भारत आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जात असताना, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटबाबत गैरसमज पसरवून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा. सध्या कोरोना व्हायरस देशासाठी एक आव्हान बनलं आहे. सरकारने कोरोनाचा सामना कसा करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्ला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दरम्यान, काळजी करण्याची आवश्यकता नाही, घाबरु नका. आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून कोरोनाचा सामना करायचं आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडणार फडणवीसांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

-अहमदनगरच्या आरोपींना मोक्का लावा; तृप्ती देसाई आक्रमक

-“मोदीजी, जरा बेरोजगारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांबाबतही पुढाकार घ्या म्हणजे अडचणी समजतील”

-सारथी संस्थेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघड

-धक्कादायक! चोरट्यांनी चक्क भाजप नगरसेविकेलाच लुटलं