राहुल गांधींनी पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व करावं, पक्षातील ‘या’ नेत्याची मागणी

जयपूर | राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचं नेतृत्व करावं अशी मागणी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केली आहे. जयपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी ही मागणी केली.

सचिन पायलट यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीवर टीका केली. त्यावेळी ते म्हणाले, “पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होतेय. यामुळे लोकांवर परिणाम होतोय. यासंदर्भात केंद्राने काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. ही भाववाढ रोखावी अशी मागणी आम्ही करत आहोत. असं न झाल्यास 29 जूनपासून काँग्रेस पक्ष याविरोधात आंदोलन करेल.”

राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर हा पदभार पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडे आला. मात्र गेल्या काही महिन्यांत राहुल गांधी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकार अपयशी पडत असल्याचं वारंवार सांगतायत. यावरून सचिन पायलट यांनी केलेल्या मागणीला महत्व प्राप्त झालंय.

मंगळवारी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील राहुल गांधीनी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनावं अशी मागणी केली. युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन बोलवून राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याची मागणी केली.

 

-कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी शासनाकडून ‘एवढा’ निधी मंजूर

-मुंबईतील रूग्णालयाबाहेरचे 1000 मृत्यू का लपवले? देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र