Top news देश

“देशाच्या संविधानावर बुलडोजर चालवला जातोय”

rahul gandhi e1646913833232
Photo Courtesy- Facebook/@rahulgandh

नवी दिल्ली |  दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्या भागातील अवैध बांधकामांवर दिल्ली महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

देशाच्या संविधानातील मूल्यांवर हा बुलडोजर चालवला जात आहे. घटनात्मक मूल्यांचा ऱ्हास सुरू आहे. याचा उद्देश हा गरीब आणि अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणं आहे. भाजपने अंतःकरणातील द्वेषावर बुलडोजर चालवला पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे. मशिदीजवळील अतिक्रमण तोडण्याचे काम सुरू आहे.

न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले असतानाही कारवाई का केली जात आहे, असा सवाल संतप्त नागरिकांमधून केला जात असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Kieron Pollard Retirement: 6 चेंडूवर 6 षटकार खेचणाऱ्या कायरन पोलार्डचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

दिल्लीच्या फिरकीपुढे पंजाबच्या फलंदाजांचे लोटांगण; 9 गडी राखत दणक्यात विजय

पिंपरी-चिंचवडचे डाॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली!

नवरा मध्यरात्री उठून असं काही करायचा की…; बायकोला तर धक्काच बसला