महाराष्ट्र मुंबई

“केंद्र सरकारला सांगतोय, पोलिसांना फक्त 48 तास द्या, मग बघा…”

मुंबई | राज्य सरकारला सांगून काही उपयोग नाही, केंद्र सरकारला सांगणार आहे पोलिसांना हात सोडून 48 तास द्या, मग बघा गुन्हेगारी कशी शुन्यावर येते. सर्व घुसखोरांना पोलीस हाकलावून लावतील, असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे.

देशातील घुसखोराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घुसखोरांमुळे गुन्हेगारी वाढत आहे. भारत हा काही धर्मशाळा नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हाकलं पाहिजे. त्यामुळे पोलिसांना हात सोडून मोकळीक द्या, असं ते म्हणाले आहेत.

ज्यांनी मोर्चे काढले त्यांना मोरच्याने उत्तर..आजच सांगतो यापुढे दगडाला दगडाने उत्तर ,तलवारीला तलवारीने उत्तर..एकोप्याने रहा,ज्या देशाने दिलं त्याला बरबाद का करतो..जो देशप्रेमी मुस्लिम आहे त्याने जागृत राहिले पाहीजे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केलं आहे. तसेच जे या कायद्याला विरोध करत आहेत त्यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय?; असं म्हणत राज ठाकरेंनी दिलं सीएएला समर्थन

-“मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही; त्यांच्या मोर्चाला मी मोर्चानेच उत्तर दिलं आहे”

-सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर

-महात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण

-…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी