राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

मुंबई |  राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. 5 ऑगस्टला भूमिपूजनाच्या सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार असून या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्याहस्ते होणार आहे. मात्र राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता दोन महिन्यांनी व्हायला हवं होतं, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिुपूजनाबाबत व्यक्त केलं आहे.

भूमिपूजन होईल, एका दिवसाची बातमी होईल, एका दिवसाच्या चर्चा होतील. पण  मला आता कल्पना नाही की आत्ता मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम का ठरवला असावा. राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला पाहिजे त्यामुळे आत्ता न होता मंदिराचे भूमिपूजन दोन महिन्यांनी झालं असतं तरी चाललं असतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दोन महिन्यांनी झालं असतं तर चाललं असतं. कारण कोरोनामुळे उद्धवलेली ही परिस्थिती थोड्या दिवसांनी निवळत सर्व काही  स्थिरस्थावर झालं असतं तर लोकांना आनंद घेता आला असता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, राम मंदिर उभारण्याची माझी आधीपासूनची भूमिका होतीआणि ती मी जाहीर सभांमधून मांडली आहे. ज्यासाठी म्हणून इतके कारसेवक त्याच्यासाठी गेले. त्याच्या खोलात जायची आता आवश्यकता नाही. त्याचं जर भूमिपूजन होत असेल तर माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही कारण…- राज ठाकरे

निष्ठावंतांना कात्रजचा घाट!; राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ‘या’ तरुणाची निवड?

काळजी करू नका, पुण्यातील परिस्थितीवर अजितदादांचं बारकाईनं लक्ष आहे- उद्धव ठाकरे

कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवांरानी चांगलंच झापलं; जनाची नाही तर…

“…नाहीतर नेहमीप्रमाणेच ‘शिक्षणाच्या आयचा घो’ होईल”