“काही लोकांना गांभीर्य कळलेलं नाही, पोलिसांना कायदा हातात घ्यावा लागेल”

मुंबई |  राज्यात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार ही परिस्थिती निपटण्यासाठी योग्य पावलं उचलत आहे. मात्र अशाही परिस्थितीत काही लोकांना घटनांचं गांभीर्य कळलेलं नाहीये. आता पोलिसांनाच कायदा हातात घ्यावा लागेल, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंडफिऱ्या लोकांबद्दलचा आपला संताप व्यक्त केला आहे.

काही मूठभर लोकांना गंभीर्य कळत नाही. कालचा बंद झाला तो भारत बंद नव्हता ती टेस्ट केस होती. लोकांनी ऐकलं नाही तर सरकारला गंभीर पावलं उचलावी लागतील, असं ते म्हणाले.

थोडा उशीर झाला, पण केंद्र आणि राज्य सरकारने योग्य पावलं उचलली आहेत. आपल्याकडच्या सरकारी यंत्रणा, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदन करतो, असं राज म्हणाले.

हातावरचं पोट असणाऱ्यांना सरकारनं मदत करावी. देशांतर्गत विमानसेवा सरकारनं बंद करावी तसंच कंपन्यांनी कामगारांचा पगार कापू नये या आणि अशा अनेक विषयांवर माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-“टाळ्या किंवा थाळ्या वाजवून कोरोना जाणार नाही, महाराष्ट्रात कर्फ्यू”

-“उद्धवजी सगळ्या भारतात तुमचं कौतुक होतंय, आता संचारबंदी लावण्याची वेळ”

-“देशावर आलेल्या कठीण प्रसंगात देखील काही जणांना राजकारण सुचत आहे”

-संपूर्ण राज्यात संचारबंदी, प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद!; राज्य सरकारचा मोठा निर्णय