गद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात हकालपट्टी- राज ठाकरे

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी कानउघाडणी केली आहे. गद्दारांना माझ्या पक्षात स्थान नाही, दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देईन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

पक्षातील काही लोक गद्दार आहेत. ते अत्यंत खोट्या आणि चुकीच्या बातम्या माध्यमांना देत आहेत. अशा कार्यकर्त्यांची नावे माझ्याकडे आली आहेत. अशी लोकं मला पक्षात नको असून येत्या दोन-तीन दिवसांत यांचं काय करायचं याबाबत निर्णय घेईन, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात कोणतंही स्थान नाही. काही जण मुद्दामहून पक्षाची बदनामी करत आहेत. अशा लोकांची नावं मला कळाली आहेत. त्यामुळे यांच्यावर लवकरच कारवाई करेन, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे दोन दिवसांपासून पक्ष बांधणीसाठी औरंगाबादमध्ये आले आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत संवाद साधत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार!

-इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेलवाल्यांना दिला दणका; चॅनेलवाल्यांनी उडवले सर्व व्हिडीओ

-‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ

-यूट्यूबवाले काड्या करतात; यूट्यूब चॅनलवाल्यांनीच मला संपवलं- इंदुरीकर

-आता आपली कपॅसिटी संपली… बघेन बघेन अन् उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करेन- इंदुरीकर