महाराष्ट्र मुंबई

माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय?; असं म्हणत राज ठाकरेंनी दिलं सीएएला समर्थन

मुंबई | सीएएमध्ये गैर काय आहे? माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात., असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये मनसेच्या मोर्चामध्ये बोलत होते.

घुसखोरांचा प्रश्न मोठा आहे, प्रत्येक वेळी माणूसकीचा ठेका नाही घेतला भारताने, जगातील प्रत्येक देश त्यांच्या नागरिकांसाठी कठोर पावलं उचलतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

जिथे मराठी मुसलमान राहतात, तिथे एकही दंगल झालेली नाही, कारण ते इथल्या मातीतले आहेत, मात्र अनेक मोहल्ले आहेत, जिथे पाकिस्तानी राहतात, मीरा भाईंदरमध्ये तर नायजेरियन राहतात, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारवर टीका केली तर हे भाजप विरोधी, काही स्तुती केली तेव्हा कौतुक केलं तर हे भाजप समर्थक, अरे मधलं काही आहे की नाही?, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

-“मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही; त्यांच्या मोर्चाला मी मोर्चानेच उत्तर दिलं आहे”

-सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर

-महात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण

-…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी

-“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर…”