‘जास्त पैसे घ्याल तर…’, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची खासगी दवाखान्यांना तंबी

 पुणे  | कोरोना संक्रमित रूग्णांसाठी सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना बाधित रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येईल. अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

कोरोना रूग्णांकडून खाजगी रूग्णालय जास्त पैसे आकारण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात होत्या. सरकारनंही या बाबीकडे लक्ष देत, खाजगी रूग्णालयानं शासकीय निर्देशाचे पालन न केल्यास संबधीत रुग्णालयावर कठोर कारवाईच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावे, लोकांच्या मनात कोरोना विषाणूविषयीची भीती कमी करण्यासाठी सोशल मिडीया तसेच दूरचित्रवाणी, होर्डिग्ज, भिंतीपत्रके, रेडीओ यांचा वापर करावा. तसेच लोकप्रतिनिधींना विचारात घेवून जनजागृती करण्यावरही भर द्यावा.अशा सूचनाही राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मुंबई व पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा विचार करता आरोग्य प्रशानाकडून आता कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. कोरोनाला विषाणूला लवकरात लवकर आळा बसावा यासाठी सरकारचे प्रयत्न  मात्र अद्याप सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-…अशा वेळी संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा असायला हवा- शिवसेना

-आत्महत्येनंतर सुशांतचे इन्स्टाग्रामवर वाढले तब्बल ‘इतके’ लाख फॉलोअर्स

-राज्यात १ जुलैपासून….. कृषीमंत्री दादाजी भुसे यांची महत्त्वाची घोषणा

-“लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही आम्हाला मार्गदर्शक”