“कोरोनाचे मृत्यू लपवायचेच असते तर…..” राजेश टोपे यांनी केला खुलासा

मुंबई |  कोरोनाचे मृत्यू लपवायचेच असते तर, आम्ही नंतर ते जाहिरचं केले नसते. बहुतांश वेळा मृत्यू झालेल्या रूग्णांचा कोरोना रिपोर्ट यायला उशीर होतो. यानंतरच मृत रूग्णाला कोरोना रूग्ण म्हणून घोषित केलं जातं, असा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांचा आकडा लपवला जात आहे. असा वारंवार आरोप राज्यातील विरोधकांकडून केला जात होता. अखेरीस आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती देत विरोधकांना अप्रत्यक्ष टोलाच लगावला आहे.

“उशीरा अहवाल आल्यावर डाॅक्टरांकडून याबाबत प्रशासनाला माहिती दिली जाते. प्रशासन ही माहिती आमच्या प्रेस रिलीजच्या ठिकाणी देतं. या प्रक्रियेमध्ये कधीकधी उशीर होत असतो.” असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये रुग्णालयाबाहेर झालेले 1000 मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांचं अखेरीस आरोग्यमंत्र्यांकडून खंडन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला फसवलं त्यांना हे सरकार शिक्षा करणारच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-काँग्रेसच्या ‘या’ माजी पंतप्रधानांचं नरेंद्र मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-‘पडळकर…रात्रभर झोप येणार नाही अशा शिव्या देऊ’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा पडळकरांना दम

-आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाला जाणार का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले …

-‘खरं राजकारण तर…’; शरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर