Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

आघाडीत बिघाडी! आरोग्यमंत्री राजेश टोपेंची शिवसेना मंत्र्यांवर नाराजी

rajesh tope new

मुंबई | राज्याच्या राजकारणात 2019 च्या विधानसभा निकालानंतर ऐतिहासिक घडामोड घडली. शिवसेनेच्या धाडसी निर्णयानं राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.

सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा वाद देखील झाले आहेत. अशात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे शिवसेना मंत्र्यांवर नाराज आहेत.

शिवसेनेचे दोन मंत्री माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, असा आरोप टोपेंनी केला आहे. राजेश टोपेंनी शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्यावर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्याचं काम भूमरे आणि सत्तार हे करत आहेत. मी अब्दुल सत्तार यांना सांगणार आहे की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नये, असं टोपे म्हणाले आहेत.

सत्तार आणि भुमरे यांनी आघाडी धर्म पाळावा, असा सल्लाही टोपेंनी दिला आहे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय या गोष्टी खऱ्या आहेत, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यातील एक महत्त्वाचा मंत्री अशाप्रकारचे आरोप करत असल्यानं प्रकरण गंभीर असल्याची चर्चा होत आहे.

महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष बाहेर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याअगोदरही अनेकदा ठिकठिकाणी तीन पक्षातील नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, राजेश टोपे हे तिन्ही मंत्री औरंगाबाद भागातून येतात. परिणामी तिन्ही मंत्र्यांना स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवताना अडचणी जाणवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे” 

मोठी बातमी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!

“…म्हणून चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रात थांबावं” 

रशियाची युक्रेनियन सैन्याला नवी ऑफर, म्हणाले…