महाराष्ट्र

प्रदूषणासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत येताहेत हे दुर्दैव- राजू पाटील

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री प्रदूषणासाठी डोंबिवलीत येताहेत हे मोठं दुर्दैव असल्याचं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज डोंबिवलीत आले आहेत.

डोंबिवलीचं प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला होता. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीतील प्रदूषणाची पाहणी केली. यावर राजू पाटीलांनी निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री प्रदूषित भागाची पाहणी करायला येणार असल्याचं समजल्यावर प्रशासनकडून रस्त्याची साफसफाई करताना दिसले.

दरम्यान, नाल्यातलं घाणं पाणी तर आता चक्क गुलाबी रस्ता डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. प्रदूषण निर्माण करणारे कारखाने अनेक समस्यांनी सध्या डोंबिवलीकर ग्रासले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-महिला अत्याचाराची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; राबवणार ‘आंध्र पॅटर्न’!!

-आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही ‘दिशा’ कायदा आणणार; अनिल देशमुखांची घोषणा

-CAA आणि NPR च्या विरोधामागे मतांचं राजकारण; मोदींचा आरोप

-पाकमध्ये हिंदूवर होणाऱ्या हल्ल्याचा अमेरिकेने नोंदवला निषेध

-तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचं अक्षर पाहून जयंत पाटील भारावले; केलं तोंडभरून कौतुक