मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लाज वाटायला हवी- राजू शेट्टी

बुलढाणा | महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. मात्र, या कर्जमाफीवर अनेकांनी टीका केली आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कर्जमाफीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील 5 लोकांनाही मिळत नाही, असं म्हणत शेट्टी यांनी बोचरी टीका केली आहे. तुम्हाला द्यायचं नसेल तर लोकांना फसवता का? असा सवालही राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. ते बुलढाण्यातील जळगाव जामोद याठिकाणी बोलत होते.

महाराष्ट्रात दररोज 10 शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. याची तुम्हाला लाज वाटालया हवी, अशी कडवट टीकाही शेट्टी यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेली दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी बुजगावणं असल्याची टीका केली होती. त्यामुळे कर्जमाफीवरुन सरकारवर टीका होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दिल्लीचा गड आम्हीच जिंकणार; भाजपच्या मनोज तिवारींचा दावा!

-दिल्लीचा गड आम्हीच जिंकणार; भाजपच्या मनोज तिवारींचा दावा!

-साहेब, हेल्मेट तुटलंय, पैसे संपलेत मला पकडू नका; पुणे पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

-झेंडा आणि अजेंडा बदलताच राज ठाकरेंचा जुना भिडू पक्षात परत!

-52 वर्ष, सलग 14 वेळा तुम्ही मला निवडून दिलं…; आळंदीच्या कार्यक्रमात शरद पवार भावूक