Top news महाराष्ट्र मुंबई

…त्यामुळे सदाभाऊ पिसाळल्यासारखं करत आहेत; राजू शेट्टींचं जोरदार प्रत्युत्तर!

मुंबई | राजू शेट्टी भंपक माणूस आहे. ते भ्रमिष्ठ झालेत. गावात जसा सोडलेला वळू असतो तसा राजू शेट्टी हा वळू रेडा आहे. जसा वळू जिथं तिथं तोंड घालतो, तसं राजू शेट्टी जिथं तिथं तोंड घालत आहेत अशी जहरी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली होती . याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी खोत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सदाभाऊ खोत हे नैराश्येतून भ्रमिष्टासारखे आरोप करत आहेत, आंदोलन फसल्यामुळे ते पिसाळल्यासारखे वागत असल्याचं प्रत्युत्तर राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना दिलं आहे. त्यामुळे दूध दर आंदोलनावरुन पुन्हा एकदा सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी आमनेसामने आले असल्याचं दिसत आहे.

राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधत ‘दूध दरवाढीवरून केलेलं आंदोलन म्हणजे कोंबडी चोरीचं आंदोलन असलेल्या व्यक्तींनी केलेलं आंदोलन, असं म्हटलं होतं. यावर खोत यांनी पलटवार करताना खालच्या भाषेत टीका केली होती.

दरम्यान, मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमीनी घेऊन ठेवल्या आहेत. तसेच जाईल तिथे खंजीर खुपासणारे राजू शेट्टी बारामतीमध्ये आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिली नाही, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-