राज्यसभेसाठी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून काही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये रजनी पाटील, मुकुल वासनिक आणि राजीव सातव यांची नावे आघाडीवर आहेत.

काँग्रेसच्या वाट्याला राज्यसभेची अवघी एकच जागा येणार असल्याने या तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. 9 मार्चला बाळासाहेब थोरात दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत.

9 मार्चला बाळासाहेब थोरात दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी परस्पर शरद पवार आणि फौजिया खान यांची नावे निश्चित करून दोन जागा आपल्याकडे घेतल्या होत्या. यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाला होता. उपमुख्यमंत्रिपद, महत्त्वाची खाती न मिळाल्याने राज्यसभेची अतिरिक्त जागा मिळावी, अशी काँग्रेसची आग्रही मागणी होती.

महत्वाच्या बातम्या-

-काय आश्चर्य ना… येस बँकेवर निर्बंध येण्या आधी गुजरातच्या बँकेने काढून घेतले 265 कोटी

-“भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका”

-…म्हणून आम्ही बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली; संजय राऊतांचा खुलासा

-निर्भयाच्या आरोपींना भरचौकात फाशी देण्यात यावी- अमृता फडणवीस

-“आमचं हिंदुत्व कायम असून, आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही”