Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“राज ठाकरे दादागिरी करत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ”

rajthackea e1649929473789

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भोंग्याविषयीच्या आक्रमक भूमिकेमुळं राज्यात वातावरण तापलेलं आहे. राज ठाकरेंवर अनेक नेते जोरदार टीका करत आहेत.

राज ठाकरे हे भाजपच्या इशाऱ्यावर बोलत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी देखील राज ठाकरेंच्या विरोधात आपलं वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरे सातत्यानं संविधान विरोधी बोलत आहेत. मशिंदीवरील भोंगे हटवण्याची भाषा असंवैधानिक असून राज ठाकरे गुंडगिरीची भाषा वापरत आहेत, असं आठवले म्हणाले आहेत.

राज ठाकरेंना समर्थन देणं हे राजकीय पातळीवर भाजपला महागात पडेल, असा इशारा आठवलेंनी भाजपला दिला आहे. परिणामी आठवलेंच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

आमचा पक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन करत नाही. राज ठाकरेंना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे मात्र ते चुकीचं बोलत आहेत, असंही आठवले म्हणाले आहेत.

मंदिरात भोंगे लावा मात्र मशिदीवरील भोंगे काढा हे बाबासाहेबांनी लिहीलेल्या संविधानाच्या विरोधात आहे. संविधानानं सर्वधर्म समभावाचा नारा दिला आहे, असंही आठवले म्हणाले आहेत.

जर राज ठाकरे असंच संविधान विरोधी वक्तव्य करत दादागिरी करत असतील तर रिपाई आपल्या पद्धतीनं उत्तर देईल, असा इशारा आठवलेंनी राज ठाकरेंना दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या आक्रमक भूमिकेमुळं राज्यात धार्मिक तणाव निर्माण झाल्याचं वक्तव्य महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत. परिणामी राज्यात पोलीस सतर्क आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

 “दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका”