अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जागा द्या, नाहीतर…- रामदास आठवले

नवी दिल्ली |  अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी आम्हाला जागा देण्यात यावी, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्यायविकास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तसंच आमच्या मागणीचा जर विचार झाला नाही तर आम्ही अयोध्येत जागा घेऊन बुद्ध मंदिर बांधू, असं आठवले म्हणाले आहेत.

अयोध्येतल्या बुद्ध मंदिरासाठी आम्हाला 20 एकर एवढी जागा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आठवलेंनी केली आहे. तसंच मी यासाठी लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं आहे.

गेली अनेक सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं दिला. ती जागा हिंदूंची असल्याचा निकाल न्यायालयानं दिला होता. त्यामुळं तिथे राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. तसंच मुस्लिमांना पाच एकर जागा देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, आमच्या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही ट्रस्ट स्थापन करून अयोध्येत जमीन घेऊन तिथे बुद्ध मंदिर उभारू, असा इशारा आता आठवलेंनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वारिस पठाणांच्या भडकाऊ भाषणाला ‘आम्ही भारताचे लोक’ राज्यघटनेने उत्तर देणार- आव्हाड

-उदयनराजेंच्या खासदारकीला संजय काकडेंचा आक्षेप; म्हणाले, उदयनराजेंचं योगदान काय??

-….म्हणून आता 12 वी चे विद्यार्थी नापास होणार नाहीत!

-“1947 मध्येच सगळ्या मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून द्यायला पाहिजे होतं”

-वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्यावर एमआयएमची मोठी कारवाई