Loading...
देश

भाजपच्या पदरी अपयश…. मात्र 2024 लोकसभेला दिल्ली मोदींंच्याच पाठीशी उभी राहिल- रामदास आठवले

नवी दिल्ली |  भाजपला दिल्लीकर नागरिकांकडून चांगल्या मतांची अपेक्षा होती परंतू दिल्लीकरांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनाच साथ दिली आहे, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि राहुल गांधी जोपर्यंत काहीबाही बोलत राहतील तोपर्यत काँग्रेसचं खातं उघडणार नाही किंबहुना आताही उघडलं नाही, अशी टीका रिपाइंचे नेते आणि मंत्री रामदास आठवले यानी केली आहे.

दिल्लीने केजरीवाल यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे तर आता पुन्हा एकदा केजरीवाल यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी दिल्लीकर नागरिकांच्या समस्या, आशा, आकांक्षा पूर्ण करण्याला स्वत:ला झोकून देऊन काम करावं, असं आठवले म्हणाले आहेत.

Loading...

आता जरी भाजपला दिल्लीकरांनी साथ दिली नसली तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्याच पाठीशी दिल्ली उभी राहिल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

दुसरीकडे दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिली आहे. 70 जागांपैकी 57 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. आपसाठी हे खूप चांगलं चित्र आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पिछाडीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत केजरीवालांची हॅट्रीक होणार…. पण ‘आप’ला सगळ्यात मोठा धक्का बसणार?

-‘आप’ला बहुमत; केजरीवालांच्या विकासापुढे महाराष्ट्र भाजपचे नेतेही काही करू शकले नाहीत!

-दिल्लीत भाजपचा पराभव दिसू लागताच शिवसेनेची सडकून टीका तर ‘आप’वर स्तुतीसुमनं!

-दिल्लीत पैसा हरला… केजरीवालांचा विकास जिंकला- नवाब मलिक

-दिल्लीत ‘आप’ची जोरदार आघाडी; पाहा कोण किती जागांवर आघाडीवर

Loading...