पडळकरांची पवारांवरील टीका आठवलेंनाही आवडली नाही, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची कानउघाडणी केली. आता एनडीएचे मित्रपक्ष असलेले रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्यायविकास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

शरद पवार हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. गोपीचंद पडळकरांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अवमानकारक आणि अयोग्य आहे. एकमेकांचा आदर करणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे पडळकर यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं, असं आठवले म्हणाले.

शरद  पवार यांचे योगदान मोठे असल्याने त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे चुकीचे आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेवर कलंक लावणारे आहे, असंही आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-यंदा गणेशाची मूर्ती किती फूट असावी?, मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

-या दोन महिन्यांत कोरोनाचे रूग्ण वाढणार, आरोग्यमंत्री टोपेंनी व्यक्त केली भिती

-‘जास्त पैसे घ्याल तर…’, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची खासगी दवाखान्यांना तंबी

-…अशा वेळी संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा असायला हवा- शिवसेना

-आत्महत्येनंतर सुशांतचे इन्स्टाग्रामवर वाढले तब्बल ‘इतके’ लाख फॉलोअर्स