कोरोना गो नाही तर कोरोना या असं म्हणू का?; आठवले टीकाकरांवर संतापले

मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोरोना संदर्भात गो कोरोना गो अशी कविता म्हंटली. त्यांच्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना आठवले टीकाकारांंवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले.

कोरोना गो नाही तर काय कोरोना या कोरोना कम असं म्हणू का?, असा सवाल करत रामदास आठवलेंनी टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. मी केलेल्या कवितेवर कोणाला टीका करण्याची गरज नाही. मी कोणावर टीका केली नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

कोरोनाने येथे येऊ नये आणि जर आला असेल तर कोरोनानं इथून निघून जावं अशीच माझी भूमिका होती, असं स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी दिलं आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी काही मूळचे चीनचे असलेलं नागरिक बॅनर घेऊन उभे होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी त्यांची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या-

-शॅडोवाल्यांचं मुख्यमंत्रिपद रिकामंच; ‘सामना’तून मनसेवर बोचरी टीका

-कोरोनाची पालकांनी घेतली धास्ती; शाळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

-#Corornaच्या पार्श्वभूमीवर महापौरांचं पुणेकरांना आवाहन

-“कर्नाटक, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप”

-#Corona पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5; आरोग्यमंत्र्यांची माहिती