मनोरंजन

रणबीर-आलिया भटच्या लग्नाची चर्चा; रणबीरनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया…

Ranbir Alia

बॉलिवूडमध्ये सध्या लगिनघाई सुरु झालीय. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची तारिख जाहीर झाली आहे, तर देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा पार पडला आहे.

या दोन जोड्यानंतर आता बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा आहे. पुढच्या वर्षी ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जातंय.

आलियासोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल रणबीर कपूरने मात्र मौन सोडलं आहे. 

‘लग्नाबाबतच्या सर्व चर्चा या ज्यांच्या-त्यांच्या व्यवसायाचाच एक भाग आहे. एका चर्चेपासून दुसरी चर्चा आणि मग तिसरी… अशाप्रकारे अफवा पसरतच जातात. लग्न ही अशी गोष्ट आहे जी योग्य त्या वेळी घडून येते. मी 35 वर्षांचा झालो आहे, आता लग्न केलं पाहिजे, असं ठरवून करता येत नाही, असं रणबीरनं म्हटलंय. 

तुम्ही आणि तुमचा साथीदार मिळून याबाबत विचार केला तर योग्य वेळी सर्व गोष्टी होतात. पण मी सध्या लग्नाबाबत विचार केला नाही, असं रणबीर म्हणतो.

‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटात रणबीर आणि आलिया एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याचं बोललं जातंय. सोनम कपूर लग्नापासून यांच्या प्रेमाची इंडस्ट्रीत चर्चा आहे.