Top news मुंबई

स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार- रावसाहेब दानवेंचा टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराच्या बाहेर पडताना दिसत नसल्यामुळे ठाकरेंविरूद्ध अनेक चर्चा रंगू होत्या. मात्र कालच पुण्याचा दौरा केलाय यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

उद्धव ठाकरे यांनी पुण्याला येताना स्वत: गाडी चालवली होती. दुपारच्या बैठका वगरे उरकून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांना काही पत्रकारांनी बाईटची मागणी केली. त्यावेळी ठाकरेंनी सर्वांना चालू गाडीतून नमस्कार घातला आणि मुंबईच्या दिशेने गेले. मात्र त्यांच्या हात करण्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

गाडी एक आणि चालवणारे दोन आहेत, स्टिअरिंग दोघांच्या हातात आहे. पण राज्याच्या कारभाराचे स्टिअरिंग एकाच्या हातात असलं पाहिजे. स्टिअरिंगवरील हात निसटला तर अपघात होऊ शकतो, असं दानवे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या हातातील स्टिअरिंग आमच्या हातात घ्यावं, अशी आमची इच्छा नाही. त्यांनी राज्यकारभार चांगला करावा, एकत्र राहावं आणि राज्याचं भलं करावं, अशी आमची अपेक्षा आहे.

दरम्यान, आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्यापैकी कुणाहीसोबत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. स्वतंत्र निवडणूक लढवू आणि या राज्यात पुन्हा स्वबळावर सरकार स्थापन करु, असंदेखील रावसाहेब दानवे यांनी यावे स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवतीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

         पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आज सेवानिवृत्त; मला सुद्धा अनेक आजार आहेत पण मी…