पुणे महाराष्ट्र

सांगलीत आठवड्याभरात 2 राष्ट्रवादी नेत्यांच्या हत्या!

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कवठे महाकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आंनदराव पाटील यांची चार दिवसांपूर्वीच हत्या झाली होती.

हारोली येथील शेतात अज्ञात हल्लेखोरांनी मनोहर पाटील यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळापासून पळ काढला. गंभीर जखमी झाल्याने मनोहर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आठवड्याभरात दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे आनंदराव पाटील यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बधु होते. आता चारच दिवसात मनोहर पाटील यांची हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“एक केजरीवाल सगळ्यांना भारी पडतायत; मागच्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामांवर मतं मागितली”

-पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींना ‘ट्युबलाईट’ची उपमा!

-आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घ्या; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

-पीडितेला भेटायला जाताना यशोमती ठाकूरांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी

-महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले- माधव भंडारी