सोशल मीडिया अकाऊंटला ‘आधार कार्ड’ जोडून घेण्यावर मोदी सरकारचा मोठा खुलासा!

नवी दिल्ली |  सोशल मीडिया वापरणाऱ्या युझर्सच्या प्रोफाईलला आधार कार्ड लिंक करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी चर्चा होती. मात्र सध्यातरी असा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नसल्याचं केंद्रिय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे.

लोकसभा खासदार गौरव गोगोई आणि महाराष्ट्रातील भाजप खासदार सुनिल मेंढे यांनी सोशल मीडियावर प्रोफाईल आणि आधाव लिंकिंकसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रविशंकार प्रसाद यांनी माहिती दिली.

चाईल्ड पोनोग्राफी ही सध्याची खूप मोठी समस्या आहे. यावर सरकार योग्य ती पावलं उचलून याला कसा आळा घालता येईल, यासंबंधीचे प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाच्या दुरूपयोग टाळण्यासाठी सरकार काही पावलं उचलत आहे. यावर लोकसभा सदनामध्ये चर्चा झाली पाहिजे, असे निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले.

दरम्यान, सोशल मीडिया वापरणाऱ्या युझर्सच्या प्रोफाईलला आधार कार्ड लिंक केलं जावं का? यावरून बरीच मतं-मतांतर होती. आता सरकारने सध्या तरी यावर निर्णय घेणार नसल्याचं सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘ECONOMY त्रस्त, मोदी मस्त’; गायक विशाल दादलानीने लगावला मोदींना टोला

-मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!

-67एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा

-एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही- उद्धव ठाकरे

-पवारांना हिंदूविरोधी म्हणनाऱ्यांना आव्हाडांनी धरलं धारेवर