मँचेस्टर | सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध भारताची घसरगुंडी उडालेली असताना सर रविंद्र जडेजा खंबीरपणे खेळपट्टीवर उभा राहिला. 39 चेंडूंमध्ये त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
41.5 षटकांमध्ये भारताच्या 6 बाद 166 धावा झाल्या आहेत. भारताची पहिली फळी अयशस्वी ठरल्यानंतर रविंद्र जडेजा आणि कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी यांनी भारताचा डाव सावरला आहे.
रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी देखील भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू खराब फटके खेळून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना आपली विकेट बहाल केली.
दरम्यान, 48 चेंडूंमध्ये भारताला 72 धावांची गरज आहे. धोनी आणि जडेजा शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबून भारताला विजय मिळवून देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.