हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देणारा रितेश देशमुखचा टिक टाॅक व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

मुंबई | गेल्या काही दिवसांत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन दिल्लीत प्रंचड हिंसाचार पाहायला मिळाला. अनेकांनी या हिंसाचारात आपला जीवही गमावला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख याने हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देणारा व्हीडिओ टिक टाॅकवर शेअर केला आहे.

टिक टॉकवर शेअर केलेल्या या गाण्याच्या लिरिक्समध्ये हिंदू-मुस्लीम एकतेबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रितेशने, हिंदू मुस्लिम भाई भाई, असं म्हटलं आहे.

व्हीडिओमध्ये असलेलं गाणं रितेशच्या  बँगिस्तान चित्रपटातील आहे. हे गाणं 2015 मध्ये प्रदर्शित झालं होतं. या गाण्याचे नाव मौला आहे. चित्रपटात रितेश आणि पुलकीत एकत्र दिसले होते. तसेच ऋतुराज मोहंती-राम सपंत या दोघांनी हे गाणे गायले होते.

दरम्यान, रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच अ‌ॅक्टीव असतो. तो यापूर्वीही समाजात घडणाऱ्या घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. काही मजेशीर व्हीडिओही त्याने शेअर केले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधानांचा परदेश दौऱ्यावरील खर्च कोटींच्या घरात; आकडा वाचून व्हाल थक्क

-इस्राईलच्या पंतप्रधानांनी कोरोनापासून वाचण्यासाठी ‘ही’ भारतीय पद्धत वापरण्याचा दिला सल्ला

-मुंगेरीलाल के सपने कभी पुरे नही होंगे; जयंत पाटलांचा मुनगंटीवारांना टोला

-उद्धव ठाकरेंनी अयोध्येला न येता मक्केला जावं; अयोध्येतील साधूंची टीका

-इटलीहून परतलेल्या राहूल गांधींनी कोरोना चाचणी केली का?; भाजप नेत्याचा सवाल