रिलायन्स जिओनं ‘या’ पॉप्युलर पॅकमध्ये केला मोठा बदल; रोज मिळत होता 2 जीबी डेटा

मुंबई | रिलायन्स जिओच्या बाजारातील पदार्पणानंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या पॅकचे दर कमी केले होते. जिओनं काही दिवसांपूर्वी 251 रूपयांचा एक प्लॅन बाजारात आणला होता. पण कंपनीनं आता त्या प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत.

रिलायन्स जिओनं आपल्या 251 रूपयांच्या लोकप्रिय प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. 251 रूपयांचं रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना यापूर्वी दररोज 2 जीबी डेटा मिळत होता. पण आता कंपनीनं तो प्लॅन नव्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट केला आहे. तर दुसरीकडे केवळ कॅटेगरीच नाही तर या पॅकसोबत देण्यात येणारे बेनिफिट्सदेखील कंपनीनं बदलले आहेत.

251 रूपयांचा हा पॅक 4 जी डेटा व्हाऊचरमध्ये उपलब्ध होता. तसंच यासोबत दररोज २ जीबीचा डेटा देण्यात येत होता. तसंच या प्लॅनची व्हॅलिडिटीही 51 दिवसांची होती.

डेटा लिमिट संपल्यानंतर युझर्स अॅक्टिव्ह प्लॅन व्यतिरिक्त हे डेटा व्हाऊचर खरेदी करून अतिरिक्त डेटाचा लाभ घेऊ शकत होते. पण यात एसएमएस किंवा कॉलिंगची सुविधा देण्यात येत नव्हती. पण आता कंपनीनं हा पॅक वर्क फ्रॉम होम या कॅटेगरीत सामिल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दोन घरं, एक फार्म हाऊस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती?

-“कोरोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य, लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं”

-11 मे ते 17 मे पर्यंत ‘या’ परिसरात संपूर्ण लॉकडाऊन; पुणे मनपा प्रशासनाचा मोठा निर्णय

-तर मी सेहवागला सोडलंच नसतं- शोएब अख्तर

-भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा