Loading...
पुणे महाराष्ट्र

अजित पवारांना सत्तेवरून हटवण्याची शालिनीताई पाटील यांची राज्यपालांकडे मागणी

सातारा |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिखर बँक घोटाळ्यात प्रमुख आरोपी आहेत. उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत तरीदेखील अजित पवार आता सत्तेवर आहेत. शिखर बँकेच्या घोटाळ्याचा गांभीर्याने विचार करता त्यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे, अशी मागणी माजी आमदार शालिनी विखे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत शालिनी पाटील यांनी त्यांची बाजू राज्यपालांसमोर मांडली. आपल्या मागणीचं त्यांनी राज्यपाल महोदयांना निवेदन दिलं.

Loading...

2007 ते 2010 या काळात 50 सहकारी साखर कारखान्यांचे लिलाव शिखर बँकेने केले. बँकेनेच त्यातल्या बऱ्याचश्या कारखान्यांना आजारी पाडलं. आजारी साखर कारखान्यांना मदत मिळवण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवा म्हणून राज्य सरकारला अनेकदा सांगण्यात आलं. निश्चित मदत झाली असती. दुसरीकडे कारखान्यांचे लिलाव करताना कोणत्याही नियमांचं पालन झालं नाही, असा आरोप शालिनीताईंनी निवेदनात केला आहे.

दरम्यान, शालिनीताईंनी घेतलेल्या भूमिकेवर आता अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ‘आप’ला मतदान करा; मतदानादिनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं ट्वीट

-काश्मिरची सुरक्षा महत्त्वाची… इंटरनेट हा मुलभूत अधिकार नाही- प्रसारण मंत्री

-मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ‘ती’ घोषणा फसवी!

-रंगेल महाराज भागवत कथा सांगायला आला अन् गावातल्या बाईला नादी लावून तिला घेऊन पळाला!

-CAA, NRC मागे घेत नाही तोपर्यंत उठणार नाही; नागपाड्यातल्या आंदोलक महिलांचा एल्गार!

Loading...