शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राजस्थान सरकारचे आदेश

जयपूर | राजस्थानमधील काँग्रेस सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दिनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थान सरकारच्या या निर्णयामुळे मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारी शाळांमधून सावरकर आणि दिनदयाल यांचे फोटो काढून टाकण्याचा आदेश देणारे पत्रक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काढलं आहे. तसेच या आदेशाचे पालन झाले नाही तर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

शाळेतील सावरकर, दिनदयाल, माजी सरसंघचालक डाॅ. हेगडेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो काढून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राजस्थान सरकारच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसला सरकारी शाळांमध्ये फक्त एकाच कुटुंबातील व्यक्तींचे फोटो हवे आहेत, असं म्हणत भाजपने टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मनसैनिकांनो आमचं उष्ट कशाला खाताय?- गुलाबराव पाटील

-“सावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय”

-क्षणिक आणि आभासी सुखाच्या मागे धावू नका; राजू शेट्टींचा शेतकरी मुलींना सल्ला

-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र

-आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?; सय्यदभाईंचा सरकारला सवाल