Uncategorized

विलासराव देशमुखांवर बायोपिक काढणं सोपं नाही- रितेश

मुंबई |  अभिनेता रितेश देशमुख आपल्याला येत्या ‘बागी 3’ हा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या हे चारही कलाकार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या प्रमोशनच्या वेळी रितेशला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला.

माझ्या वडिलांचा सरपंच ते मुख्यमंत्री हा जीवनप्रवास थक्क करणारा होता. अनेक लोकांनी त्यांच्या जीवनावर कथा लिहिल्या आणि मला चित्रपटाची निर्मितीसाठी विचारलं. पण ते इतके सोपे नाही. मी योग्य पटकथेची वाट पाहत असल्याचं,  रितेश देशमुखनं म्हटलं आहे.

जेव्हा एखादा विषय आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असतो तेव्हा आपण इतर गोष्टींचा विचार करत नाही. जर मी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढला तर लोक म्हणतील मी केवळ त्यांच्या जीवनातील चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला.  दुसरं कोणी या चित्रपटाची निर्मिती केली तर ते असे नव्हते किंवा त्यांच्या बोलण्याची शैली अशी नव्हती असंही माझं मत होईल, असं रितेश म्हणाला.

दरम्यान, दोन्ही बाजूंचा विचार करुन बायोपिक काढणं तितकं सोपं नाही, असं रितेशनं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सगळं काम अजित पवारच करतायेत… मुख्यमंत्री काहीच करत नाहीत- नारायण राणे

-आम्ही कोणत्याही कामांना स्थगिती देत नाही, आम्ही विकासाचे मारेकरी नाही- मुख्यमंत्री

-दिल्लीत शांतता ठेवणं ही सरकारची जबाबदारी- RSS

-केंद्र सरकारला खडेबोल सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली आम्ही केली नाही तर…- भाजप

-चंद्रकांतदादा म्हणाले, ‘रात्री निर्णय अन् सकाळी शपथ’; त्यावर अजितदादा म्हणाले..