महाराष्ट्र मुंबई

रितेश देशमुखवर टीका करणाऱ्यांनी एकदा हा व्हीडिओ नक्की पहावा…

Riteish Deshmukh Video

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख गेल्या आठवड्यात चांगलाच चर्चेत आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीमध्ये बसून फोटो काढल्यामुळे त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती. मात्र त्यानंतर रितेशने मोठ्या मनाने माफी मागून अनेकांची मनं जिंकली होती.

आता त्याच दिवसाचा रायगडावरचा एक व्हीडिओ समोर आलाय. या व्हीडिओत रितेश देशमुखचा दिलदारपणा समोर आलाय. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर अनेकांना रितेश देशमुखचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. 

रायगडावर रितेश देशमुख आणि टीमला बीडचं एक वृद्ध दाम्पत्य भेटलं. मी लातूरला मला ओळखलं का?, असा सवाल रितेशनं या जोडप्याला विचारला. मात्र त्यांनी ओळखलं नाही. रितेशनं या जोडप्यासोबत गप्पा मारल्या. 

रितेशनं या आजोबांना मिठी मारली. अखेर हा विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे, असं या दाम्पत्याच्या मुलानं त्यांना सांगितलं. त्यावर आजोबांनी रितेशला ओळखलं. त्याच्यासोबत हात मिळवला. या प्रकारानं रितेशचा दिलदारपणा समोर आलाय. सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय. रितेशवर टीका करणाऱ्यांनी हा व्हीडिओ एकदा नक्की पहावा, असा सल्ला दिला जातोय. 

व्हीडिओ बघा-