Loading...
महाराष्ट्र मुंबई

….म्हणून रोहित पवारांना तरूणाने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी!

मुंबई |  सरकारी नोकर भरती प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर विद्यार्थ्यांकडून अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारने महापोर्टल बंद करण्याविषयी काहीही ठोस भूमिका घेतलेली नव्हती पण उद्धव ठाकरे सरकारने तरी भूमिका घ्यावी नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असा आक्रोश एका युवकाने आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडला आहे.

रोहित पवार यांनी आज ट्वीटरवरून तरूणांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना बहुतांशी तरूणांनी महापोर्टलविषयीची तक्रार केली. आपण जर महापोर्टल बंद करून परीक्षा घेतली तर मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असं एका विद्यार्थ्याने म्हटलं आहे.

Loading...

आत्महत्येची परवानगी मागणाऱ्या तरूणाला रोहित पवार यांनी समज घातली आहे. आत्महत्येचा विचार कुणाच्याही मनात येता कामा नये. आपण या जगात जगत असताना आपले कुटुंब आपल्यावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे, असं रोहित म्हणाले.

दुसरीकडे फक्त नोकरच नाही तर उद्योजक पण घडावेत यासाठी आपले काय प्रयत्न असतील? , असा प्रश्न एका तरूणाने विचारल्यावर शाळेपासून तर कॉलेज पर्यंत याबाबतीतील चर्चा करावी लागेल. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

Loading...

-चंद्रपुरात पोलिसांची लॉजवर धाड; 13 कॉलेज जोडपी ताब्यात

-कामं होत नसली की फक्त बहाणे सांगायचे; फडणवीसांची अजित पवारांवर टीका

-नाईट लाईफ करून श्रीमंतांच्या पोरांची सोय केली शेतकऱ्यांचं काय??- फडणवीस

Loading...