मातृदिनी आमदार रोहित पवारांनी आईसाठी स्वत:च्या हातानं बनवला चहा

मुंबई | आज ‘मदर्स डे’ आहे. आईबाबतच्या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा खास दिवस. अनेक नेते मंडळींनी आईसोबतचे काही सुंदर फोटो शेअर करत आठवणी जागवल्या आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही मातृदिनाच्या निमित्ताने आईसाठी एक खास गोष्ट केली आहे. रोहित पवार यांनी स्वयंपाक घरात आईच्या आवडीचा चहा बनवला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी आजचे काही खास फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. ‘मातृ दिनाच्या निमित्ताने आजीने दिलेल्या भांड्यात आईच्याच मदतीने आज आईसाठी आल्याचा चहा बनवला.

चहा साधारणच बनला होता पण खूप सुंदर झाला असा आईचा प्रतिसाद होता. चहा खरंच सुंदर झाला होता की मुलाने बनवला म्हणून सुंदर लागला ते आईलाच माहीत. पण यावरुन कळतं आई काय असते ते, असं रोहित यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-केंद्राच्या असंवेदनशील अवस्थेमुळे स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांची टीका

-…तर मी निवडणूक लढवणार नाही; उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना मेसेज

-मटकाकिंग रतन खत्रीचं निधन

-यापुढे ही तुमचं प्रेम असंच राहू द्या; कोरोनातून सावरल्यानंतर आव्हाडांची फेसबुक पोस्ट

-अजानसाठी लाऊड स्पीकरचा वापर बंद करावा- जावेद अख्तर