देश

दिल्लीत सुफडासाफ झालेल्या काँग्रेसला रोहित पवार यांचा सल्ला!

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. 70 जागांपैकी आप 57 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये. यावरच बोट ठेवत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसला मार्मिक सल्ला दिला आहे.

काँग्रेसकडे खूप चांगले नेते आहेत. त्यांनी संघटनात्मक कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळी संघटनात्मक काम चांगलं असतं त्यावेळी निवडणुकीत त्याचा चांगला परिणाम दिसून येतो, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Loading...

दिल्लीत भाजपचे 300 खासदार, संपूर्ण केंद्रिय मंत्रिमंडळ आणि 12 भाजप मुख्यमंत्री प्रचाराला जाऊन देखील दिल्लीकरांनी भाजपला नाकारलं, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली. तसंच दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा माज उतरवला, असंही रोहित पवार म्हणाले.

दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेने देशाला नवा विचार दिला आहे. भाजपच्या विरोधात आता प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असंही मत त्यांनी यावेळी मांडलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-इथं द्वेषाचं राजकारण होणार नाही… आज प्रेम जिंकलं; दिल्ली विजयानंतर आपची प्रतिक्रिया

-“भाजपच्या पदरी अपयश…. मात्र 2024 लोकसभेला दिल्ली मोदींंच्याच पाठीशी उभी राहिल”

-दिल्लीत केजरीवालांची हॅट्रीक होणार…. पण ‘आप’ला सगळ्यात मोठा धक्का बसणार?

-‘आप’ला बहुमत; केजरीवालांच्या विकासापुढे महाराष्ट्र भाजपचे नेतेही काही करू शकले नाहीत!

-दिल्लीत भाजपचा पराभव दिसू लागताच शिवसेनेची सडकून टीका तर ‘आप’वर स्तुतीसुमनं!