Loading...
Uncategorized

दिल्लीत काँग्रेसला शरद पवार मिळाले नाहीत का??; रोहित पवारांचं खास उत्तर

मुंबई | दिल्लीत आपला तिसऱ्यांदा जनतेने सेवेची संधी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. तर भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. तसंच काँग्रेसचा दुसऱ्यांदा सुफडासाफ झाला आहे. दिल्लीत काँग्रेसला शरद पवार मिळाले नाहीत का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावरच भाष्य केलं आहे.

रोहित पवार म्हणाले-

दिल्लीत आम आदमी पक्ष सत्तेत होता. केंद्र सरकारमध्ये भाजप सत्तेत आहे. लढत होत असताना या दोन प्रमुख पक्षांमध्येच लढत झाली. ज्यांना यश येत नाही त्यांनी काही गोष्टी स्विकारल्या पाहिजेत की आपलं संघटन आहे का?? कधीकधी पॉलिसी आणि स्टॅटर्जी यांवर चर्चा केली नसेल तर यश मिळत नाही. काँग्रेसच्या बाबतीत काही ठिकाणी या गोष्टी झाल्याचं चित्र आहे. तरीसुद्धा काँग्रेसकडे नेते आहेत. त्यांनी संघटनात्मक कामाकडे लक्ष द्यायला हवं.

Loading...

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना विकास दाखवला आणि दिल्लीच्या लोकांनी देखील त्यांच्या विकासाच्या संकल्पनेला साथ दिली. आज दिल्लीत सत्याचा विजय झाला आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

दुसरीकडे दिल्लीत भाजपचे 300 खासदार, संपूर्ण केंद्रिय मंत्रिमंडळ आणि 12 भाजप मुख्यमंत्री प्रचाराला जाऊन देखील दिल्लीकरांनी भाजपला नाकारलं, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली. तसंच दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा माज उतरवला, असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-दिल्लीत सुफडासाफ झाल्यानंतर रोहित पवार यांचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले…

-इथं द्वेषाचं राजकारण होणार नाही… आज प्रेम जिंकलं; दिल्ली विजयानंतर आपची प्रतिक्रिया

-“भाजपच्या पदरी अपयश…. मात्र 2024 लोकसभेला दिल्ली मोदींंच्याच पाठीशी उभी राहिल”

-दिल्लीत केजरीवालांची हॅट्रीक होणार…. पण ‘आप’ला सगळ्यात मोठा धक्का बसणार?

-‘आप’ला बहुमत; केजरीवालांच्या विकासापुढे महाराष्ट्र भाजपचे नेतेही काही करू शकले नाहीत!

Loading...