Loading...
पुणे महाराष्ट्र

कुणी जेलमध्ये टाकायची भिती घातली तर पवारसाहेबांना आठवा- रोहित पवार

सांगली | समोरून कुणी कितीही ताकदीचा आला तरी अजिबात घाबरायचं नाही. एखाद्याने जेलमध्ये टाकायची भाषा केली अन् घाबरवण्याचा प्रयत्न केला तर पवारसाहेब आठवायचे, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. इस्लामपूरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पवारसाहेबांना ईडीची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. काही लोक इतिहासात राहतात पण त्यांना असं वाटायला लागलं आहे की ते नवीन युगाचे चाणक्य आहेत. मग ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात, असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या गृहमंत्री अमित शहा यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.

Loading...

शरद पवारांना भीती दाखवू असं अहंकारी ताकदींना वाटलं होतं. मग त्यांनी मोठं हत्यार म्हणून ईडीला बाहेर काढलं. ईडीच्या चौकशीला जाण्यासाठी शरद पवार एकटे नाही तर सर्व जनता त्यांच्यासोबत आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन पवारसाहेब थांबले मग ईडीनेही माघार घेतली. त्यामुळे कुणीही भीती दाखवली तरी काही होत नाही, असं रोहित म्हणाले.

दुसरीकडे रोहित पवार यांनी विधानसभेला केलेल्या प्रचारावर आक्षेप घेत राम शिंदेेंनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर बोलताना रोहित म्हणाले, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढलो नाही. त्यामुळे विजय सत्याचा होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी! आमदार म्हणतात…

-ठाकरे सरकारचा फडणवीसांना धक्का; समित्यांवरच्या अशासकिय नियुक्त्या रद्द!

-दिल्लीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भाजपचं एक पाऊल मागे; प्रादेशिक पक्षांना जवळ करणार

-शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश; राजकीय वादाला फुटलं तोंड

-मनसैनिकांनो आमचं उष्ट कशाला खाताय?- गुलाबराव पाटील

Loading...