Loading...
पुणे महाराष्ट्र

रोहित पवारांचं पहिलं प्रेम अन् त्याचा किस्सा, वाचा….

सांगली |  सध्या ‘व्हॅलेंटाईन डे’ आठवडा सुरु असल्याने तरुणाईमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने व्हॅलेंटाईनचा आठवडा साजरा करत असतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या पहिल्या प्रेमाचं गुपित सांगितलं आहे. ते  के. बी. पी. कॉलेजच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते.

कॉलेजमध्ये तुम्हा सर्वांना जे प्रेम होतं तसं प्रेम मला काही कधी झालं नाही. तुम्ही सर्वजण ज्या प्रेमाचा विचार करता, तसं प्रेम आयुष्यात एकदाच केलं. ते प्रेम मी माझ्या बायकोवर केलं आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार आहे, असं पवार म्हणाले आहेत.

Loading...

काॅलेजमध्ये असताना माझं प्रेम कुणावरही झालं नाही, अशी कबुलीही रोहित पवारांनी दिली आहे. मी मुंबईला होतो. त्यावेळी माझं कष्टावर प्रेम होत. जीम करायचो, त्यावेळी जीमवर प्रेम होतं, असंही ते म्हणाले आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’ दोन दिवसांनी येत आहे, हे सुद्धा मला व्हाॅट्सअ‌ॅपवर आलेल्या मेसेजमुळे कळालं, असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-केजरीवालांची लेक भाजपवर तुफान बरसली; म्हणाली…

-शिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; ठाकरे सरकारचा निर्णय

-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ; ठाकरे सरकारची मोठी घोषणा!

-सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??- बच्चू कडू

-निवडणूक आयोगाचा मनसेला दणका; धाडली राज ठाकरेंना नोटीस

Loading...