Loading...
महाराष्ट्र मुंबई

‘व्हेलेंटाईन डे’ चं गॅश कनेक्शन; शुभेच्छा देताना रोहित पवारांनी करुन दिली गॅस दरवाढीची आठवण!

मुंबई |  व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे आपल्या मनातील साऱ्या भावना आपल्या जोडीदाराला सांगून मोकळं व्हायचं असा हा दिवस…. आपल्या आवडत्या व्यक्तीला सरप्राईज देण्याचा हा दिवस…! याच दिवसांचं निमित्त आणि औचित्य साधत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवक युवतींना व्ह‌ॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत मात्र त्या वेगळ्या पद्धतीने…!

हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे! हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे, असं रोहित पवार यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय, अशी आठवण त्यांनी करून दिली आहे.

Loading...

दोन दिवसांपूर्वीच महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 145 रुपयांनी वाढ झाली आहे. रोहित पवारांनी व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देताना लावलेलं गॅस कनेक्शन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, इंडियन ऑइलने विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-“पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है”

-पुलवामा हल्ल्याने कुणाचा फायदा झाला??- राहुल गांधी

Loading...

-‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींना शाळेनं दिली शपथ; ‘मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’!

-गेहलोत सरकारने ग्रामीण विकास योजनेचं नाव बदललं; गोळवळकर हटवून केलं महात्मा गांधी!

-मागणी तुम्ही केली तर चालते; अन् आम्ही केली तर मग त्यात बिघडलं कुठं?- राज ठाकरे

Loading...